

amey khopkar on digpal lanjekar
esakal
येत्या काही दिवसात मोठंमोठे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र मराठी सिनेमांच्या तारखा कायमच निर्मात्यांच्या डोक्याचा ताप बनतो. एका दिवशी तीन- चार मराठी सिनेमे प्रदर्शित केले जातात. ज्यामुळे प्रेक्षक नाहीत. येत्या ३० तारखेला अमेय खोपकरांचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरांनीही त्यांच्या 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची तारीख बदलून ३० जानेवारी केली. याबद्दल अमेय यांनी दिग्पाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर बोलण्याचीही तसदी घेतली नसल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केलाय.