
'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या खूप जवळच्या. मालिकेत अर्जुन आणि सायली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र त्यासोबतच मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रियाचा प्रेक्षकांना प्रचंड राग येतो. मालिकांमध्ये खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्री या खऱ्या आयुष्यातही तशाच असतात असं प्रेक्षकांना वाटतं. मात्र त्यांचं कलाकारांसोबतचं सेटवरील बॉण्डिंग खूप वेगळं असतं. तसंच प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडोलकर सेटवर कशी वागते याबद्दल अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली याने सांगितलं आहे.