
'ठरलं तर मग' ही मालिका घराघरात पाहिली जाते. या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. गेले २ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. टीआरपीमध्ये नंबर १ वर असणाऱ्या या मालिकेतील सायली आणि अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेने अमित भानुशाली याला घराघरात ओळख मिळवून दिली. मात्र इथपर्यंतचा अमितचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्याच्या या प्रवासात त्याचं कुटुंब त्याच्या पाठीशी होतं. त्याच्या वडिलांनी त्याला खूप पाठिंबा दिला. मात्र जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा त्याचे वडील या जगात नाहीत. आता एका कार्यक्रमात अमितने हा भावुक प्रसंग सांगितलाय.