
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं एकेकाळी एकमेकांवर प्रेम होतं असं म्हटलं जातं. त्यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या तेव्हा छापून येत होत्या. ‘दो अनजाने’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची जवळीक वाढली होती असं म्हटलं जातं. अमिताभ यांच्याबद्दलचं रेखा यांचं प्रेम स्पष्ट दिसायचं. आजही अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांच्यातील लव्ह ट्रँगलबद्दल बोललं जातं. 'उमराव जान' चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी देखील त्यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. अमिताभ यांनी रेखासोबत चांगलं केलं नाही असं ते म्हणाले होते.