
२००७ मध्ये सुरू झालेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम अजूनही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. त्यामागचं पहिलं कारण म्हणजे कार्यक्रमाचा वेगळेपणा आणि दुसरं कारण म्हणजे अमिताभ बच्चन. KBC मध्ये सर्वसामान्य ज्ञानावर आधारित जगभरातले प्रश्न विचारण्यात येतात. हॉट सीटवर बसणाऱ्या व्यक्तीला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं असतं. आजपर्यंत खूप स्पर्धक ७ कोटी रुपये जिंकून घरी गेले आहेत. मात्र आता 'कौन बनेगा करोडपती' च्या प्रेक्षकांसाठी धक्कादायक बातमी आहे. हा शो ज्यांनी विशिष्ट उंचीवर नेला तो व्यक्ती म्हणजेच अमिताभ बच्चन हा शो सोडणार असल्याचं बोललं जातंय.