
amitabh bachchan
esakal
गेल्या काही वर्षात अलिबाग हे खूप मोठं पर्यंटन स्थळ म्हणून उदयाला आलं आहे. याच दरम्यान अलिबागमधल्या जमिनीच्या किमतीदेखील प्रचंड वाढल्या आहेत. कलाकार हे कायम सेकंड होमला महत्व देताना दिसतात. कधीकधी आरामासाठी ता कधीकधी गुंतवणूक म्हणून कलाकार अलिबागमध्ये जागा घेताना दिसतात. शाहरुख खान, रणवीर सिंग, दिपीका पादुकोण, अनुष्का शर्मा यांनी आधीच अलिबागमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. आता अमिताभदेखील अलिबागकर झाले आहेत.