
'मोगॅम्बो खुश हुआ' हे वाक्य आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. त्याचं कारण म्हणजे अभिनेते अमरीश पुरी यांनी जिवंतकेलेली मोगॅम्बो ची भूमिका. १९८७ साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील मोगॅम्बोची भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांनी एका सर्व सामान्य व्यक्तीची भूमिका केली होती. ज्याला असं घड्याळ मिळतं जे त्याला गायब करतं. यात त्यांच्यासोबत अभिनेत्री श्रीदेवीही मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाने त्यांना हवाहवाई ही ओळख मिळवून दिली. मात्र या चित्रपटासाठी अमरीश पुरी हे पहिली पसंती नव्हते.