
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारे बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक अमरीश पुरी यांचं नाव आजही तितक्याच अदबीने घेतलं जातं. अमरीश पुरी हे अनेक चित्रपटात मुख्यतः खलनायकाच्या रूपातच दिसले. मात्र ते माणूस म्हणून खूप चांगले होते. त्याच्या अभिनयासमोर भले भले अभिनेते फिके पडत. त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच समोरच्याला धडकी भरायची. अनेकदा तर चित्रपटातील नायकावरही हा खलनायक भारी पडायचा. अमरीश पुरी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना ठाऊक आहे. सध्या त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा आहे.