

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी 2025 च्या पावसाळ्याला आणखी रंगतदार बनवले आहे. त्यांचे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले ‘सावन’ या गाण्याचे विस्तारित आवृत्ती नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या गाण्याच्या माध्यमातून अमृता यांनी पावसाळ्याची जादू आणि भावनिक स्पर्श पुन्हा एकदा रसिकांपर्यंत पोहोचवला आहे.
याशिवाय, त्यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये प्रदर्शित झालेले ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणेही प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याच्या व्हिडिओत अमृता बंजारनच्या भूमिकेत दिसल्या होत्या, त्यांच्या अभिनयाने आणि गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.