
मराठी सिनेसृष्टीची चंद्रा म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने 'वाजले की बारा' म्हणत सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. आज २३ नोव्हेंबर रोजी अमृता तिचा वाढदिवस साजरा करतेय. तिच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करतायत. आज अमृता तिचा ४० वा वाढदिवस साजरा करतेय. अशातच तिचा पती हिमांशू मल्होत्रा यानेही तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केलीये.