Viral Video: अमृताचा टेलिव्हिजनवर कमबॅक ; व्हिडीओ झाला व्हायरल

Amruta's new video went viral: अभिनेत्री अमृता खानविलकरचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ; तिच्या या व्हिडीओमुळे ती टेलिव्हिजनवर कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.
Amruta Khanvilkar
Amruta KhanvilkarEsakal

गेल्या काही काळापासून अमृताचा एक नवीन प्रोमो गाजतोय. अमृता आणि संकर्षण यांचं त्यांचं काम सुरु असतानाच अपहरण झाल्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे अमृता आणि संकर्षण नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत याची चर्चा रंगू लागलीये.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृता आणि संकर्षण झी मराठीच्या आगामी कार्यक्रमात झळकणार आहे.

मालिका कि रिऍलिटी शो ?

2024 वर्षाची सुरुवात अमृताने दमदार केली आणि एका मागोमाग एक अश्या कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसत राहिली. " लुटेरे , चाचा विधायक है हमारे 3 , 36 डे " अश्या भन्नाट प्रोजेक्ट्स नंतर अमृता पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करतेय.

पण तिच्या या व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे ती एखादी मालिका करणार कि रिऍलिटी शो बाबत प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागेल.

वेब शो, चित्रपट आणि आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या बद्दल ती खूप उत्सुक असल्याचं कळतंय. नव्या प्रोजेक्ट बद्दल सोशल मीडिया वर रील पोस्ट करत अमृता म्हणते " नव्या रंगात नव्या ढंगात कमिंग सून " ! आता नेमका हा प्रोजेक्ट काय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

पहा रील:

अमृताचे आगामी प्रोजेक्ट्स

या नव्या प्रोजेक्ट सोबत अमृता येणाऱ्या काळात " कलावती , ललिता बाबर , पठ्ठे बापूराव " अश्या चित्रपटात दिसणार आहे. या बरोबरच ती आणखी एका नव्या सिनेमाची तयारी करत असल्याची चर्चा आहे पण तिचा हा नवा सिनेमा कोणता ते अजून समजू शकलं नाहीये.

गेल्या वर्षात अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गाजला त्यानंतर ती हिंदी रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. पुन्हा एकदा नव्या मराठी सिनेमात तिला पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com