
'चंद्रमुखी' चित्रपटात आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयानेही प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. ती मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री आहे. तिने 'गोलमाल' या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं. ती काही हिंदी चित्रपटांमध्येही दिसली. अमृताने २०१५ साली हिंदी अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. हिमांशू पंजाबी आहे आणि अमृता मराठी. त्यांनी 'नाच बलिये ७' हा कार्यक्रमही जिंकला होता. ते दोघेही वेगवेगळे राहतात. अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत असतो. मात्र काही वर्षांपूर्वी अमृताने त्याला अनफॉलो केलेलं जायची प्रचंड चर्चा झालेली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिमांशूने त्याबद्दल सांगितलंय.