
गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. कुणी अरेंज मॅरेज केलं तर कुणी आपल्या हक्काच्या प्रेमासोबत लग्नगाठ बांधली. तर काही महिन्यांपूर्वी 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्री मोनिका दबडे हिने आपण आई होणार असल्याचं सांगितलं होतं. चाहत्यांनी तिच्यावर लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तिच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आपण आई होणार असल्याची गुडन्यूज दिलीये. तिने एक व्हिडिओ शेअर करत अत्यंत हटके पद्धतीने आपला आनंद शेअर केला आहे.