
दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांनी पारंपारिक भुताटकीला टाटा करून, भीती आणि भावना यांचं भन्नाट कॉम्बो प्रेक्षकांसमोर आणलं आहे. हा चित्रपट म्हणजे 'जारण'. या थरारक कथेच्या मध्यभागी आहे अमृता सुभाष, जी साकारते राधाची गुंतागुंतीची भूमिका. राधा – रहस्यांनी, खोट्या गोष्टींनी आणि न बोललेल्या भीतींनी वेढलेली स्त्री. या कॅरेक्टरमध्ये मोठ्याने आरडाओरड नाही, पण सायलन्समधलं पॉवर आणि नजरेतली भीती आहे. आता अमृताने तिने ही भूमिका कशी साकारली याबद्दल सांगितलं आहे. तिला ती बाई खऱ्या आयुष्यात देखील भेटली होती असं ती म्हाणालीये.