
अमृता सुभाष हिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय. चित्रपटांसोबतच ओटीटीवरही तिचा दबदबा आहे. सोबतच ती रंगभूमीवरही सक्रीय आहे. मध्यंतरी अमृता तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली होती. गेल्या वर्षी तिने लस्ट स्टोरीज २मध्ये इंटिमेट सीन्स दिले होते. सोबतच 'साठेचं काय करायचं' या नाटकातही तिचा सहकलाकाराला मिठी मारण्याचा सीन होता. तेव्हा एका आजोबांनी तिला याचा जाब विचारला होता. आता एका मुलाखतीत तिने इंटिमेट सीनबद्दल बोलताना तो किस्साही सांगितलाय.