
नाटक म्हणजे मराठी रंगभूमीचा श्वास आहे. चित्रपटांपेक्षाही नाटकावर प्रेक्षक कायमच अधिक प्रेम करताना दिसतात. मराठी नाटकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. मात्र नाटकादरम्यान अनेकदा अशा काही घटना घडत असतात ज्या अनाकलनीय असतात. काही घटनांवर कशा पद्धतीने उत्तर द्यावं हेदेखील समोरच्याला समजत नाही. अशीच एक घटना 'असेन मी नसेन मी' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडली. अमृता सुभाष, नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले यांचं नवंकोरं नाटक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या प्रयोगादरम्यान असं काहीतरी घडलं ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.