
Bollywood News: २०२३ मध्ये बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे 'अॅनिमल'. रणबीर कपूरच्या करिअरमधील एक आव्हानात्मक भूमिका त्याने या चित्रपटात साकारली. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी हे महत्वाच्या भूमिकेत दिसले. १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल'ने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले. यात रश्मिकाची भूमिका वादग्रस्त ठरली. कुणी या भूमिकेचं कौतुक केलं तर कुणाला हे पात्र मुळीच पसंत पडलं नाही. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का ही भूमिका आधी रश्मिकाला नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्रीला ऑफर झालेली.