
'माझ्या नवऱ्याची बायको' मधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अनिता दाते हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र आता अनिता एका वेगळ्याच रूपात दिसतेय. तिचा ;जारण' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. हा चित्रपट कर्मकांडावर आणि भुताटकीवर आधारित आहे. यात ती अगदी भयानक रूपात दिसतेय. तिने यात एका कर्मकांड करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारलीये. या निमित्ताने तिने दिलेली एक मुलाखतही सध्या चर्चेत आहे. तिने यात तिला आलेले दोन अनुभव शेअर केलेत.