
'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. तिची आणि सुशांत सिंग राजपूत यांचंही जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान ते दोघे प्रेमात पडले. अनेक वर्षांचं रिलेशनशीप आणि चाहत्यांचं प्रेम मिळत असतानाच त्याचं ब्रेकअप झालं. काही वर्षांनी सुशांतच्या मृत्यू झाला. तेव्हा मात्र त्याच्या निधनासाठी अंकिताला जबाबदार ठरवण्यात आलं. तिला भयंकर ट्रोल करण्यात आलं. त्यावर अंकिताने एका मुलाखतीत उत्तर दिलेलं. तिचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.