अंकिता लोखंडेचे विकीसोबत चौथ्यांदा लग्न?

अंकिता दक्षिण भारतीय पोशाखात, तर विकी शर्ट-पँट लूकमध्ये दिसला. चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले आहे. याशिवाय काही लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या आगामी चित्रपटाचा सीन देखील असू शकतो.
Ankita Lokhande got married for the fourth time viral photos
Ankita Lokhande got married for the fourth time viral photosSakal

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने काही महिन्यांपूर्वी पती विकी जैनसोबत बिग बॉस १७ मध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये विकी आणि अंकिता त्यांच्या भांडणामुळे खूप चर्चेत आले होते.

सलमान खानच्या शोमध्ये दोघांमध्ये एवढी भांडणे झाली होती की, शो संपल्यानंतर ते घटस्फोट घेतील, असा अंदाजही प्रेक्षकांनी लावला होता. मात्र, असे काहीही झाले नाही. कारण शोमधून बाहेर आल्यानंतर अंकिता आणि विकी दोघेही नॉर्मल झाले. या जोडप्यामध्ये आणखी प्रेम दिसून आले.

नुकताच या जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही सात फेरे घेताना दिसत आहेत. या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या दोघांनी चौथ्यांदा लग्न केल्याचा अंदाज सर्व जण लावत आहेत. अंकिता आणि विकी एकमेकांचा हात पकडून उभे आहेत, त्यांच्या गळ्यात फुलांचा हार असून समोर हवनकुंड आणि पंडितही आहेत.

अंकिता दक्षिण भारतीय पोशाखात, तर विकी शर्ट-पँट लूकमध्ये दिसला. चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले आहे. याशिवाय काही लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या आगामी चित्रपटाचा सीन देखील असू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com