
'पवित्र रिश्ता' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिला या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र त्यानंतर ती फारशी मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली नाही. ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली. आताही तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती चक्क हिजाब घालून दिसतेय. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चकीत झालेत.