

ankita walawalkar
ESAKAL
'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती कायमच चाहत्यांसोबत जोडलेली असते. तिचे फॉलोवर्सदेखील तिच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशातच आता अंकिताने चाहत्यांना गुडन्यूज दिलीये. तिने मुंबईत स्वतःचं घर घेतलंय. हे घर कुठेय हे देखील तिने सांगितलंय.