

ankita walawalkar on suraj chavan
ESAKAL
'बिग बॉस मराठी ५' मध्ये सुरज चव्हाण ट्रॉफीचा विजेता ठरला होता. त्याने ट्रॉफी जिंकली खरी पण तेव्हाही सोशल मीडियावर अनेक नेटकरी तो या ट्रॉफीच्या योग्य नसल्याचं म्हणत होते. केवळ दया म्हणून 'बिग बॉसने ही ट्रॉफी त्याच्या हातात ठेवली. मात्र त्याच्यापेक्षा इतर स्पर्धक जास्त चांगले खेळले असं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. सुरजने आपल्याला गेम कळत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता अंकिताने आता त्याचा खरा चेहरा उघड केलाय. त्याला सगळं गेम कळत होता आणि हे आम्हाला घराबाहेर आल्यानंतर समजलं असं म्हणत तिने सुरजची पोलखोल केलीये.