अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

ANKITA WALAWALKAR MANGO STOLEN:लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्या आंब्यांच्या पेट्यांची चोरी झाल्याचं सांगितलं आहे.
ankita walawalkar

ankita walawalkar

ESAKAL

Updated on

'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसलेली लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. युट्यूब, इंस्टाग्राम हे संभाळण्यासोबतच ती एक बिझनेसवूमनदेखील आहे. ती अभिमानाने आपली मालवणी भाषा मिरवते. तिचा सिंधूद्योग नावाचा एक उद्योग आहे. ज्यात ती आंबे आणि आंब्याचे व कोकणातले वेगवेगळे पदार्थ विकते. मात्र याच वस्तूंच्या डिलिव्हरी दरम्यान तिला एक वाईट अनुभव आलाय. तिच्या आंब्याच्या पेट्या चोरीला गेल्यात. तिची फसवणूक झाल्याने तिने सविस्तर व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com