
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर अंकिता वालावलकर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. ती तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगत याच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या पत्रिकादेखील तिने वाटल्यात. नुकतीच ती लग्नाआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेली होती. तिथून आल्यानंतर मात्र तिने एक पोस्ट शेअर केलीये जी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात.