
'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. अंकिताने तिच्या वागण्याने सगळ्यांची मनं जिंकली. कोकणचा चेडू म्हणून ती घराघरात लोकप्रिय आहे. अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यापूर्वी तिच्या प्री वेडिंगशूटची जोरदार चर्चा रंगली होती. यात आपण काहीतरी वेगळं करणार असल्याचं तिने सांगितलं होतं. आणि म्हंटल्याप्रमाणे तिने एक आगळंवेगळं प्रीवेडिंग शूट चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.