Ankush Chaudhari : 'महाराष्ट्र शाहीर'नंतर अंकुशची फॅन्टसी नाईट ; पोस्टने वेधलं लक्ष

Ankush Chaudhari New Project : अभिनेता अंकुश चौधरी नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सोशल मीडियावर त्याच्या या प्रोजेक्टची चर्चा सुरु आहे.
Ankush Chaudhari
Ankush Chaudhari Esakal

उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अंकुश चौधरी कायमच त्याच्या नवनव्या प्रोजेक्टने सगळ्यांचं मन जिंकून घेतो. आजवर अंकुशने अनेक नवनवीन सिनेमात काम केलंय. गेल्या वर्षी त्याच्या प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली आणि आता अंकुशने त्याच्या नव्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अंकुशची पोस्ट

सोशल मीडियावर अंकुशने एक रील शेअर केलं ज्यात 'अंकुश चौधरी घेऊन येत आहे फॅन्टसी नाईट' असं लिहिली होतं आणि त्याला अंकुशने "Soon in Monsoon.

PS: If #IndvsPak is the mother of all rivalries, ही पण सगळ्या फॅन्टसी ची #AI आहे." असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे सगळेचजण कन्फ्युज झाले आहेत. आता अंकुशचा सिनेमा आहे कि वेब सिरीज कि एखादा नवा रिअॅलिटी शो ते मात्र अजून समजलं नाहीये.

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत अंकुश नक्की कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय याची विचारणा केली ? तर अनेकांनी अंकुशच्या या पोस्टवर कमेंट करत तो नव्या सिनेमात काम करतोय का ? किंवा एखादया सिनेमाची निर्मिती करतोय का? असा प्रश्नही विचारलाय. पण या प्रश्नाच उत्तर मिळवण्यासाठी सगळ्यांना काही काळ वाट पाहावी लागेल.

अंकुशचा गेल्यावर्षी दगडी चाळ २ आणि महाराष्ट्र शाहीर हे सिनेमे रिलीज झाले. त्यानंतर बराच काळ तो कोणत्याही सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला नाहीये. महाराष्ट्र शाहीर या सिनेमात त्याने शाहीर साबळेंची भूमिका साकारली होती. केदार शिंदेनी या सिनेमाचं निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं तर सना शिंदेने यात शाहिरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारली होती.

दगडी चाळ २ मध्ये त्याने पुन्हा एकदा मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत बरोबर काम केलं . तर सध्या तो स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावतोय. त्याच्याबरोबर फुलवा खामकर आणि वैभव घुगेही या शोचं परीक्षण करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com