
PSI Arjun Movie: मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार असलेला अभिनेता अंकुश चौधरी सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक हिट चित्रपटात अभियानाचे करत त्याने प्रेक्षकांवर आपली जादू चालवलीये. आता अंकुश पुन्हा एकदा दोन धडाकेबाज चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातील एक चित्रपट आहे 'पी.एस.आय अर्जुन'. नुकताच 'पी.एस.आय अर्जुन' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या एका चेहऱ्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय . या ट्रेलरमध्ये छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री अंकुश चौधरीच्या हिरोईनच्या भूमिकेत दिसतेय.