
'तू चाल पुढं' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री दीपा परब हिने पेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप पाडलीये. तिने आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यावर हक्काचं स्थान निर्माण केलं. 'बापानं भारी देवा' मधून आपल्या अभिनयाचा ठसा पाडणारी दीपा प्रेक्षकांची लाडकी आहे. तिच्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला केला होता. घराघरात तिचे चाहते आहेत. मात्र 'तू चाल पुढं' नंतर ती कुठल्याच मालिकेत दिसली नाही. अशात आता तिच्य नव्या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.