
छोट्या पडद्यावर नव्याने सुरू झालेली मालिका 'देवमाणूस' सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. डॉक्टरचा मधला अध्याय या मालिकेत पाहायला मिळतोय. गोपाळच्या घरी जाऊन त्याची ओळख घेऊन राहणारा डॉक्टर नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तो आता टेलर बनून स्त्रियांची ब्लाउज शिवतोय. त्याच्या सोबत आणखी एक पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे त्याच्या वडिलांची भूमिका करणारे आनंद अभ्यंकर म्हणजे अप्पा. आता या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक भलतेच खुश झालेत. यात आनंद चक्क गौतमी पाटीलसोबत नाचताना दिसतेय.