

ILA BHATE
ESAKAL
'कमळी' ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलीये. या मालिकेने स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग' मालिकेला तगडी टक्कर दिलीये. मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी कमळी तर प्रेक्षकांची लाडकी आहेच सोबतच घराची कर्ती, जबाबदार आणि कणखर अशी स्त्री अशी भूमिका आहे अन्नपूर्णा आजीची. 'कमळी' मालिकेत अन्नपूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री ईला भाटे याची साकारली आहे. अन्नपूर्णा आजी ही आपल्या नातीच्या शोधात आहे असं दाखवण्यात आलंय. मात्र ही भूमिका साकारणाऱ्या ईला यांना सुरुवातीला टीकेचा सामना करावा लागला होता.