Oscars 2025 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘अनोरा’चा बोलबाला; भारताच्या ‘अनुजा’ला अपयश
Anora Movie : ९७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘अनोरा’ चित्रपटाने पाच प्रमुख पुरस्कार जिंकून वर्चस्व गाजवले. मात्र, भारताचा ‘अनुजा’ लघुपट अंतिम फेरीत पोहोचूनही अपयशी ठरला.
लॉस एंजिलिस : जगातील चित्रपट क्षेत्रातील तारे-तारकांसह रसिकांचे डोळे दरवर्षीच्या ऑस्करवारीकडे लागलेले असतात. यंदाच्या ९७ व्या अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘अनोरा’ या चित्रपटाने दबदबा राखला.