

pinga g pori pinga
ESAKAL
कलर्स मराठीवर नुकताच 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू झालाय. प्रेक्षक या कार्यक्रमात गुंग असले तरी दुसरीकडे कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. कारण या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पिंगा गं पोरी पिंगा' मधील लोकप्रिय अभिनेत्रीने आता मालिकेचा निरोप घेतलाय. यापूर्वीही एका अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतलेला. मालिकेतील मंजुषा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अमृता रावराणे हिने मालिकेतील तिचं पात्र संपल्यानंतर तिने मालिकेचा निरोप घेतला होता. आता तिच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.