
छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांची आवडती गोष्ट. गेल्या काही महिन्यात अनेक नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. टीआरपी कमी असल्याने काही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेतला जातो. त्यात स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' काही दिवसातच सगळ्यांचा निरोप घेणार आहे. तर त्यापाठोपाठ आणखी एक मालिका ऑफ एअर होण्याच्या तयारीत आहे. या मालिकेच्या कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर शेअर केल्यात.