
झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या काही दिवसातच या मालिकेचा शेवटचं भाग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मालिकेत एजे आणि लीला यांची प्रेमकहाणी पाहायला मिळालेली. अशातच कमी टीआरपीमुळे चॅनेलने या चांगल्या मालिकेचा द एन्ड करायचा ठरवलं आणि आता ही मुलीला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंगदेखील पूर्ण झालंय. सेटवरील अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. मात्र एकीकडे एक मालिका संपली आणि दुसरीकडे एजेच्या पहिल्या पत्नीची दुसऱ्या मालिकेत एंट्री झाली आहे.