
Bollywood News : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर देशभर शोककळा पसरली आहे. मात्र, याच वेळी बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर आणि चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर हंसल मेहता यांच्यातील वादामुळे मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटाचे पुन्हा एकदा वादग्रस्त स्वरूप समोर आले आहे.