
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत सावनीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. मात्र अपूर्वाला खरी लोकप्रियता मिळाली ती 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे. या मालिकेत ती शेवंता ही भूमिका साकारत होती. आता ती खलनायिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. करिअरमध्ये टॉपवर असणाऱ्या अपूर्वाने वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप वेदना सहन केल्या आहेत. अपूर्वाने २०१४ साली लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच तिचा घटस्फोट झाला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने लग्नसंस्थेवर भाष्य केलं आहे.