

archana dhotre in mastershef
esakal
मास्टरशेफ इंडिया सीझन ९ मधील स्पर्धक अर्चना धोत्रे मुंबईचे प्रतिनिधीत्व करत रूपाली विकास जाधवसोबत जोडी म्हणून स्पर्धा करत आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अर्चना गेल्या काही काळापासून व्यवसाय म्हणून स्वयंपाक करत आहेत. त्या आसपास राहणाऱ्या ग्राहकांसाठी टिफिन आणि घरगुती पद्धतीचे जेवण तयार करतात, तसेच सोशल मीडियावर आपल्या पाककृती शेअर करतात. त्यांनी फक्त आपले पाककला कौशल्य दाखवण्यासाठी नाही तर स्वत:च्या जीवनाला कलाटणी देऊन कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याच्या ध्येयासह मास्टरफेशमध्ये सहभाग घेतला.