

archana patkar on hemlata bane
esakal
'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांची या मालिकेतील आजीची भूमिका चांगलीच गाजली. मात्र काही दिवसांपूर्वी अर्चना पाटकर यांची सून हेमलता बाणे- पाटकर हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. गोरेगाव इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं दोन महिलांना अटक केली आहे. यात हेमलतादेखील आहे. आता अर्चना यांनी हेमलताचा आपल्या कुटुंबाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.