
आसामची सोशल मीडिया स्टार अर्चिता फुकन, जी ‘बेबीडॉल आर्ची’ या नावाने ओळखली जाते, सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील १.२ दशलक्ष फॉलोअर्स आणि बोल्ड रील्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण अलीकडेच तिच्या अमेरिकन पॉर्न स्टार केंद्रा लस्ट यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोने खळबळ उडवली आहे. या फोटोमुळे तिच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ‘जस्ट आसाम थिंग्ज’ या इन्स्टाग्राम पेजने ती एक AI-जनरेटेड मॉडेल असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.