Singer Arijit Singh amid growing speculation about his possible entry into politics ahead of the West Bengal Assembly elections.

Singer Arijit Singh amid growing speculation about his possible entry into politics ahead of the West Bengal Assembly elections.

esakal

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Arijit Singh on the path to politics : पश्चिम बंगालमधील निवडणुकीआधी राजकीय पक्ष काढणार असल्याचाही चर्चांना उधाण
Published on

Singer Arijit Singh Latest News: प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंहने काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेत, पार्श्वगायन न करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता अरिजीत सिंह राजकारणात पदार्पण करणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय, असा दावा केला जात आहे की ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी एक नवीन राजकीय पक्ष सुरू करू शकतात.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गायक अरिजीत सिंह राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहेत. तथापि, त्यांचा राजकीय पक्ष लगेच स्थापन केला जाणार नाही आणि २०२६ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीतही भाग घेणार नाही.

बंगाली चित्रपटसृष्टीतील सूत्रांचे म्हणणे आहे की, अरिजीत प्रथम तळागाळातील पातळीवर निवडणूक लढवण्याचा विचार करू शकतात. तथापि, त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दलची माहिती गुप्त ठेवण्यात येत आहे. मात्र वृत्तानुसार, त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे की त्यांनी त्यांचे करिअर राजकारणाकडे वळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

https://www.esakal.com/premier/arijit-singh-retirement-from-playback-singing-shocks-fans-bollywood-music-news-msr87

पार्श्वगायन सोडण्याचा निर्णय़ जाहीर करताना अरिजीत सिंहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलय होतं की, 'सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. तुम्ही इतके वर्ष श्रोते म्हणून प्रेम केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला घोषणा करताना आनंद होत आहे की, मी आतापासून कोणतंही नवीन गाणं गाणार नाहीये. कारण मी आता थांबतोय. आतापर्यंतचा हा प्रवास खूप चांगला होता'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com