

THARLA TAR MAG UPCOMING TWIST
ESAKAL
Star Pravah Tharle Tar Mag Serial Twist: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये आता नवनवीन ट्विस्ट येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत सायलीने प्रियाला चांगलाच धडा शिकवला आहे. प्रिया कायमच पार्टीला जातेय किंवा मैत्रिणीकडे जातेय असं कारण सांगून नागराज आणि महीपतला भेटायला जायची. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला तिचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी प्रिया नेमकी कुठे जातेय हे पाहत तिची पोलखोल केली. त्यामुळे अश्विनही तिच्यावर चांगलाच संतापला. ती खोटं बोलली हे समजल्यावर त्याने तिला चांगलंच सुनावलं. आता आणखी या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे