

arun kadam wife vaishali
esakal
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या खास मालवणी लहेज्याने सगळ्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. हास्यजत्रेच्या स्किटमधले त्यांचे सरपंचदेखील सगळ्यांना आवडतात. अरुण यांची पत्नी वैशालीदेखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. वैशाली यांनी एका मुलाखतीत त्यांचा नव्या घराचा किस्सा सांगितला जेव्हा अरुण नव्या घरात जिन्यावरून रुसून बसले होते आणि आईला सोडून जाणार नाही असं म्हणत होते.