
हेमा मालिनी धर्मेंद्रच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्यासोबतच लग्नबंधनात अडकल्या. पण धर्मेंद्रच्या आधी त्या अभिनेते संजीव कुमारशी लग्न करणार होत्या. पण संजीव कुमार यांच्या एका कृतीने सगळं बिघडवलं. हेमा मालिनी यांनी संजीव कुमारशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी एका मुलाखतीत संजीव कुमार कुठे चुकले आणि हेमा मालिनीसोबतचे त्यांचं नाते का बिघडलं हे सांगितलं आहे.