
मराठी मालिकाविश्वातील गाजलेलं नाव म्हणजे अरुंधती. 'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेतून अरुंधती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने तब्बल ५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. आजही अनेक प्रेक्षक ही मालिका रिपीट टेलिकास्टवर बघतात. जेव्हा या मालिकेने निरोप घेतला होता तेव्हा अनेक प्रेक्षकांना वाईट वाटलं होतं. त्यांची लाडकी अरुंधती आपल्याला सोडून जाऊ नये असं वाटत होतं. मात्र आता प्रेक्षकांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.