

मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असून नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.