
बॉलिवूडच्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या आवाजाची जादू ही सगळ्यांच्या सर्वश्रुत आहे. त्या सोशल मीडियावरही चर्चेत असतात. मात्र आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात त्या चक्क विक्की कौशल याच्या 'तौबा तौबा' या गाण्यावर डान्स करताना दिसतायत. त्यांच्या हुक स्टेप्स पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करतायत.