

RINKU RAJGURU NEW MOVIE COLLECTION
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने 'सैराट' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रिंकूने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटात काम करणं सुरूच ठेवलं. ती आज मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच तिचा 'आशा' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. ज्यात रिंकू आशा सेविकेच्या भूमिकेत दिसतेय. आशा सेविकांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. १९ डिसेंबररोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केलीये हे पाहूया.