

ashish vidyarthi on first divorce
esakal
बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आशिष विद्यार्थी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही वर्षात चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलं. त्याचं कारण म्हणजे त्यांचं दुसरं लग्न. आशिष यांनी वयाच्या ६० व्या वर्षी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं. या लग्नामुळे ते ट्रोलदेखील झाले. मात्र त्यापूर्वी वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांचं पहिलं लग्न अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि आरजे राजोशी बरुआ यांच्याशी झालं होतं. राजोशी आणि आशिष यांना अर्थ विद्यार्थी नावाचा मुलगा आहे. मात्र लग्नाच्या २४ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे.