
आता तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा, कारण ६ सप्टेंबरपासून अमेझॉन एमएक्स प्लेयरवर ‘राईज अँड फॉल’ (Rise and Fall) हा नवा रिॲलिटी शो येत आहे. या शोमध्ये १६ सेलिब्रिटी ‘सत्ते'साठी एकमेकांशी संघर्ष करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन 'शार्क टँक' फेम अशनीर ग्रोव्हर करणार असून, तो पहिल्यांदाच होस्ट म्हणून एका शोमध्ये काम करत आहे.